श्री नागनाथ संस्थान च्या दर्शनास येणाऱ्या भाविकांना त्यांच्या किमान गरजा राहण्याची सोय, पिण्याचे पाणी, धार्मिक विधी इ. साठी काही प्रमाणात सोयी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
राहण्याची सोय: देवस्थान समितीने भाविकानसाठी भरलेल्या संकुलनात राहण्याची सोय गेली आहे या संकुलनात एक मोठा हॉल, 13 खोल्या स्वतंत्र स्नानगृह व शौचालय बांधली असून त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
याशिवाय मंदिराच्या आवारात दोन मोठे सभामंडपाची सोय केलेली आहे. मंदिराच्या प्रांगणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतंत्र कुप नलिकेद्वारे द्वारे मोठे जलकुंभ उभारून केली आहे.
परगावाहून आलेल्या भाविकांसाठी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत प्रत्येकी नाममात्र शुल्क घेऊन भोजनाची सोय केलेली आहे.