ॐ नमः शिवाय!!

श्री क्षेत्र आद्य 8 वे ज्योतिर्लिंग नागेश्वर औंढा नागनाथ

सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैल्य मल्लीकार्जुनम!
उज्जैन्या महाकाल ओंकारम मल्लेश्वर!
परल्यांम वैद्यनाथचं डाकीन्याम भीमाशंकरम!!
सेतुबंधे तू रामेश्वम नागेशम दारुकावणे!!
वाराणस्या तू विश्वेश्वम त्र्यंबकं गौतमीटते!!
हिमालये तू केदारम घृष्णेश्वरम शिवालय!!
×

ॐ नमः शिवाय!!


 
 श्री क्षेत्र आद्य 8 वे ज्योतिर्लिंग नागेश्वर औंढा नागनाथ

​बृहतस्तोत्र रत्नाकरात वर्णिलेल्या भारतातील 12 ज्योतिर्लिंग पैकी 5 हे महाराष्ट्रात आहे. भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावरील आद्य मानल्या जाणाऱ्या नागेश्वर नागनाथ मंदिर, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली (महाराष्ट्र) हे गाव प्रसिद्ध आहे. हिंगोली जिल्ह्या पासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

श्री नागनाथाचे मंदिर एका (289 X 190) अशा भव्य आवारात असून त्या सभोवताली मोठा परिसर आहे. या मंदिराला वीस फूट उंचीची तट भिंत आहे. मंदिराच्या परिसरात चार प्रवेशद्वार असून त्यापैकी उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार होय.मुख्य मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर हेमांडपंथी आणि अतिपुरातन असल्याचे सिद्ध होते. मंदिरावर असणारे कोरीव काम आपल्याला दिसता क्षणी मंत्रमुग्ध करतात. मंदिरावर असंख्य अशा अतिशय सुंदर, सुबक शिल्प कोरलेली दिसतात. मुख्य मंदिराची लांबी 126 फूट, रुंदी 118 फूट आणि उंची 96 फूट आहे. अशा ​विस्तीर्ण भूभागामध्ये व्यापलेले अत्यंत सुंदर, सुबक व नक्षीदार आकर्षक आपणास पहावयास मिळते.

मुख्य मंदिराच्या परिसरातील माहिती: श्री नागनाथ मुख्य मंदिराच्या परिसरामध्ये विनायक स्वामी समाधी मंदिर, आनंदी महाराज समाधी मंदिर, श्री नरसिंह मंदिर, श्री काशी विश्वनाथ मंदिर, श्री नागतीर्थ ऋणमोचन तीर्थ, श्री शनी मंदिर, ओमकार ममलेश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री संत नामदेव मंदिर, श्री सोमनाथ मंदिर, श्री घृष्णेश्वर मंदिर असे विविध मंदिर आपणास पहावयास मिळतात.

श्री नागनाथ तीर्थ व ऋणमोचन तीर्थ: मुख्य मंदीरच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये असणारे हे तीर्थ नागतीर्थ म्हणून ओळखल्या जाते. पूर्वीच्या काळी याच तीर्था च्या पाण्याने देवपूजा केली जात असे.
महामायावी भीमासुराने राजाचे सिंहासन बळकावून घेतले व त्यांचे पूर्ण राज्य हस्तगत केले. त्यानंतर नागराज या ठिकाणी आले. त्यांनी येथे एका कुंडाची म्हणजेच तीर्थाची निर्मिती केली. तीर्थाच्या समक्ष नागराजांनी श्री नागनाथाची घोर तपस्या केली, त्याच्या भक्तीवर प्रभू शिवशंकर प्रसन्न झाले, प्रकट झाले. नागराजाला त्यांच्या इच्छित वर प्रदान केला व हे स्थान आज पासून नागतीर्थ म्हणून प्रसिद्ध होईल असा आशीर्वाद दिला. असे परम पवित्र असणारे हे नागतीर्थ.
दर 60 वर्षांनी येणारी कपिला षष्ठीला याच कुंडामध्ये काशीची गंगा अवतरीत होते. अशी अख्यायिका देखील सांगितली जाते.

ऋणमोचन तीर्थ: नागतीर्थाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असणारे तीर्थ यालाच ऋणमोचन तीर्थ असे म्हणतात.
मांडव्यऋषी या स्थानावर आले असता त्यांनी नागतीर्थाच्या ईशान्य कोपऱ्यात एका तीर्थाची निर्मिती केली याच तीर्थाच्या तटावर त्यांनी त्रिकाल स्नान करून तप केले. तसेच आपल्या पितरांच्या नावाने त्यांची याच तीर्थावर इतरांना तर्पण श्राद्ध करून सर्व प्रकारे ऋणमुक्त झाले.
म्हणूनच या तीर्थाचे नाव ऋणमोचन तीर्थ असे पडले. याच तीर्थाला सासु सुनेची कुंड(बारव) देखील नाव आपल्याला प्रचलित झालेले आढळते.

हरिहर तीर्थ: हरिहर तीर्थ मंदिराच्या पूर्व बाजूस आहे. तीर्थाच्या पूर्व बाजूस कालिकामाता मंदिर, तीर्थाच्या नैऋत्य कोपऱ्यात वैकुंठेश्वर मंदिर तसेच पश्चिम बाजूस गणपती मंदिर व मारुती मंदिर आहे.

​श्री शनी मंदिर: नागतीर्थाच्या काठावर असलेले हे शनी मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे. युधिष्ठिरला बारा वर्षाच्या वनवासात मिळालेली पीडा परिहार करण्यासाठी त्यांनी येथे शनी उपासना केली व ते शनी पीडेतून मुक्त झाले. येथे राहू केतू शनि अशी तीन मूर्ती पहावयास मिळतात.

​श्री नरसिंह मंदिर: ​मुख्य मंदिराच्या पूर्वेस श्री नागनाथ तीर्थाच्या समीप श्री लक्ष्मी नरसिंह आहे. येथे दरवर्षी नरसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

श्री विनायक स्वामी मंदिर: मुख्य मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात असणारे हे समाधी स्थान आहे. श्री विवेकानंद स्वामी या नावाने ओळखले जाणारे उत्तर प्रदेशातील संत यांचे हे स्थान होय. ते अत्यंत विद्वान, कर्मठ आणि प्रखर हिंदुत्ववादी होते.
पूर्वीच्या काळी निजाम राजवटीत या मंदिरावर झालेल्या हल्ल्यात आक्रमणात त्यांनी विशेष भूमिका घेतल्याचे सांगव्यात येते. त्यांनी त्यांच्या योग साधनेने आक्रमण परतावून लावलेले आपले वडील मंडळी आवर्जून सांगतात.




श्री आनंदी महाराज समाधी मंदिर: मुख्य मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात हे मंदिर असून श्री क्षेत्र गोकर्ण महादेवाच्या पायथ्याशी तप करीत असता वाघाने या आनंदी महाराजांवर हल्ला केला व त्यांना अत्यंत जखमी केले. काही मंडळींनी त्यांना विसाव्यासाठी मंदिरातील ओवरी येथे विसाविले. येथेच त्यांना समाधी प्राप्त झाली त्यांचेच हे समाधी मंदिर.

श्री संत नामदेव मंदिर: मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील मंदिर हे संत शिरोमणी नामदेव मंदिर आहे.
 "फिरविले देऊळ जगा माजी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला"
या अमृत वचनातून आपल्याला संत नामदेवांची भक्ती व त्यांच्या असणाऱ्या भगवंता वरचा विश्वास दिसून येतो.
याची आख्यायिका अशी जाते की पूर्वी हे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे होते. संत नामदेव महाराज मंदिरासमोर कीर्तन करू लागले.
​  महाशिवरात्रीची यात्रा असल्याने अन्य भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्या - येण्याचा त्रास होत असल्याने संत नामदेवांना मागील म्हणजे पश्चिमेकडे बसण्यासाठी सांगितले गेले. नामदेव महाराजांच्या भक्ती सामर्थ्याने महादेवाने आपले मंदिर पूर्वेचे पश्चिमेस फिरवल्याचे ज्ञात होते. त्याच ठिकाणी आता विठ्ठल रुक्मिणी व संत नामदेव महाराजांचे मंदिर बांधण्यात आले. त्यांची निष्पाप भक्ती पाहून श्री नागनाथ प्रभू प्रसन्न झाले व आपले संपूर्ण मंदिराचे मुख्य द्वार हे नामदेव महाराजा कडे केले. त्यावेळी पासून हे द्वार पश्चिमाभिमुख्य आहे. या थोर संत शिरोमणी नामदेवाच्या अधिकार व भक्ती सामर्थ्याने हे घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ स्मारकरुपी इष्टदेव श्री विठ्ठल रुक्मिणी सह मंदिर स्थापना करण्यात आले.

श्री संत विसोबा खेचर मंदिर: हे मंदिर मुख्य मंदिराच्या उत्तरेकडील भागात असून हे मंदिराच्या बाहेर आहे. श्री संत नामदेव महाराज यांचे गुरु श्री विसोबा तर यांचे हे मंदिर. परमेश्वराचे अस्तित्व हे चराचरा मध्ये अनु रेणू मध्ये आहे याची प्रचिती वृद्ध अवस्थेत असणाऱ्या विसोबांनी संत नामदेवास दिली. विसोबा शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेल्या अवस्थेत पाहताच हा काय प्रकार आहे अशी विचारणा संत नामदेवाने केली असता, विसोबां यांना पाय हलविण्याची विनंती केली. पाय हलविताच तेथे दुसरी पिंड पाहता नामदेवांनी त्यांना गुरु केले. त्याच विसोबांचे हे समाधी मंदिर.

चिंतामणी मंदिर: मुख्य मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस चिंतामणी मंदिर असून या शिवलिंगाचे दर्शन केले असता शिवभक्त सर्व चिंतामुक्त होतो अशी अख्यायिका आहे.

देवीची शक्तीपीठे:   मुख्य मंदिरापासून दक्षिणेकडे तीन किलोमीटर अंतरावर श्री कनकेश्वरी माता मंदिर आहे.
  मुख्य मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर परभणी रोडवर श्री खांडेश्वरी माता आहे.
  मुख्य मंदिरापासून पश्चिमेस तीन किलोमीटर अंतरावर श्री पद्मावती माता मंदिर आहे.
  मुख्य मंदिरापासून उत्तरेस गावात भक्ताची आई माता मंदिर असून हे प्रभू श्री नागनाथांची बहीण असल्याची अख्यायिका आहे.
  मुख्य मंदिराच्या पूर्वेस हरिहर तलावाच्या काठावर श्री कालिका माता मंदिर आहे.

श्री रावळेश्वर मंदिर: मुख्य मंदिराच्या उत्तरेस रावळेश्वर मंदिर आहे. श्री रावळेश्वर हे प्रभू श्री नागनाथांचे मामा असल्याची अख्यायिका सांगण्यात येते. ​दर महाशिवरात्रि व विजयादशमीस "श्री" ची पालखी मामांच्या भेटीस जाण्याची परंपरा आहे.


श्री आदी नागनाथ मंदिर: मुख्य मंदिराच्या वायव्य दिशेस हे मंदिर आपण असून मंदिराला श्री आदी नागनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. ​सूर्यकुंड तलावाच्या तिरावर हे मंदिर वसलेले आहे. यास आदी नागनाथ असे संबोधले जाते.

 
 ​औंढा नागनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगांची प्रति रूपे:

1. श्री सोमनाथ मंदिर: मुख्य मंदिराच्या वायव्य भागात असणारे हे बारावी ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे. त्या सोमनाथांचे प्रति रूप म्हणून ही स्थापना केली असावी.

2. श्री मल्लिकार्जुन मंदिर व कार्तिक स्वामी मंदिर: हे मंदिर मुख्य मंदिराच्या अग्नेय कोपऱ्यात आहे. याच मंदिरात कार्तिक स्वामी यांचे देखील मूर्ती पाहावयास मिळते.श्री शैल्य मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कार्तिकयास प्रसन्न होऊन स्थापना झालेले कार्तिक स्वामी मल्लिकार्जुन दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आपणास दिसते.

3. महाकाल मंदिर: मंदिराच्या पूर्व दिशेला हरिहर तलावाच्या दक्षिणेस महाकाल मंदिर आहे.

4. ओमकार ममलेश्वर: नागतीर्थापासून मंदिरात प्रवेश करीत असता डाव्या बाजूस मुख्य मंदिराच्या अग्नेय कोपऱ्यात पहावयास येते. ओंकारेश्वरला जशी दोन शिवलिंगाचे दर्शन होते, तसेच येथे दोन शिवलिंग आढळतात.

5. वैजनाथ मंदिर: दक्षिणेस रुद्रगया तीर्थाच्या काठावर हे मंदिर आढळून येते.

6. भीमाशंकर मंदिर: मुख्य मंदिराच्या घृष्णेश्वर मंदिरालगत महादेव आपणास पहावयास मिळतो.

7. रामेश्वर मंदिर : मुख्य मंदिराच्या अग्नेय बाजूस रामेश्वर मंदिर आहे.

8. नागेश्वर मंदिर: श्री नागेश्वर हे आपले मुख्य मंदिर स्थान आहे.

9. विश्वनाथ मंदिर: मंदिराच्या भागात काशी विश्वेश्वर मंदिर आहे. कपिला षष्ठीस नागा फिरतात काशीची गंगा येते म्हणून तीर्थाच्या समीर ते स्थापन असावे.

10. त्रंबकेश्वर मंदिर: मुख्य मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा लगत असणारे हे मंदिर.

11. केदारेश्वर मंदिर: मुख्य मंदिराच्या तर बाजूस घृष्णेश्वर मंदिरा असणारे शिवपिंड.

12. घृष्णेश्वर मंदिर: मुख्य मंदिराच्या उत्तर घृष्णेश्वर मंदिर आहे.